About Us
सी. सी. टी. एन. एस. चे उद्दिष्ट हे आहे की, कोअर ॲप्लीकेशन सॉफ्टवेअरमध्ये (सी. ए. एस.) सर्व डेटा आणि नोंदी एकत्रित करणे. जे सध्या भारतातील २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. या प्रकल्पात पोलीस कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे, आणि नागरिकांना सेवा देणारे पोर्टलचाही समाविष्ट आहे.
1) सी. सी. टी. एन. एस. हे एफ. आय. आर. नोंदणी, अन्वेषण आणि पोलीस ठाण्यांमध्ये चार्जशीटशी संबंधित डेटाचे डिजिटायझेशन करते.
2) सी. सी. टी. एन. एस. हे गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्यात मदत करते.
3) सर्व नवीन घटकांसह या प्रकल्पाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे मध्यवर्ती नागरिक पोर्टलला राज्यस्तरीय नागरिकांच्या पोर्टलसह दुवा साधला जाईल. ज्यामुळे अनेक नागरिकांना अनुकूल सेवा मिळतील.
4) सी. सी. टी. एन. एस. (सी. ए. एस.) सॉफ्टवेअरच्या योग्य कामकाजासाठी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चांगले प्रशिक्षण घेत आहेत.
5) पोलीस स्टेशनच्या सर्व नोंदी सी. सी. टी. एन. एस. (सी. ए. एस.) मध्ये हरवलेली व्यक्ती, मृतदेह, अटक केलेले व्यक्ती, गुन्हेगार, उत्सव परवानग्या इत्यादी प्रमाणे सी. सी. टी. एन. एस. (सी. ए. एस.) मध्ये पोलीस स्टेशनच्या सर्व नोंदी ऑनलाईन /ऑफलाइन प्रविष्ठ केल्या जातात.
6) आर. बी. टी. सेंटर मधील आमच्या तज्ञ प्रशिक्षकांद्वारे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना सी. सी. टी. एन. एस. कोर्स प्रशिक्षण दिले जाते.