अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष (Anti Human Trafficking Unit – AHTU), नवी मुंबई ची स्थापना २२ मार्च २०१२ रोजी झाली आहे.
प्रमुख कार्ये:
- मानवी तस्करी, लैंगिक शोषण, जबरदस्तीची मजुरी, बाल तस्करी तसेच महिलांचे व बालकांचे शोषण रोखणे.
- तस्करीच्या प्रकरणांची माहिती संकलित करून त्यांचा शोध, तपास व कायदेशीर कारवाई करणे.
- तस्करीच्या जाळ्यांचा पर्दाफाश करून पीडित व्यक्तींची सुटका, संरक्षण, पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणे.
- हॉटेल, लॉज, बार, स्पा, औद्योगिक क्षेत्रे व इतर संवेदनशील ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई, जनजागृती, गुप्त माहिती संकलन आणि बचाव मोहिमा राबविणे.
- महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे.