एकता, अखंडता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.